*हिंगणा येथे गुरु राखा सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम; ३० बांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल*
प्नतिनिधी:जयश्री चव्हाण
समाजातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ व्हावी, या उद्देशाने गुरु राखा सेवा संस्था महाराष्ट्र आणि हिंगणा तहसील प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकारातून हिंगणा येथे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्याचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे ३० बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले.
गुरु राखा सेवा संस्थेचे सेवादार भाई विक्रम सिंह जी, भाई गुरप्रीत सिंह जी आणि भाई सुनील सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरादरम्यान अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रशासकीय प्रक्रियेबाबत सहकार्य करण्यात आले.
*गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न*
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. मात्र, माहितीचा अभाव किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी, या हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामुळे अर्जदारांना दिलासा मिळाला असून, समाजहितासाठी संस्था आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
*सेवा हीच खरी साधना, समाजहित हेच ध्येय*
गुरु राखा सेवा संस्थेच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि गरजू बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त होत आहे
