वीज कोसळून 16 वर्षीय कु. दीपिका राठोड यांचा शेतात मृत्यू…!!
दिनांक
16 मार्च 2026
रोजी.
शेतात काम करत असताना सध्याचे नैसर्गिक वातावरण बिघडल्यामुळे शिळवणी तांडा येथील बालिकेचा वीज कोसळून जागीच मृत्यू दुर्दैवी घटना गेल्या दोन-तीन दिवसापासून तालुक्यासह पूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून विजेच्या गडगडाटा सह अनेक ठिकाणी तूरळक जोरदार पाऊस पडत आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रतिनिधी तथा गोर सेनेचे मा.तालुकाध्यक्ष श्री विशाल पवार यांनी मा.तहसीलदार साहेब देगलूर यांच्याशी फोनवर संपर्क साधून सविस्तर अशी माहिती देऊ सदरील कुटुंबास तीन-चार दिवसात मदत देण्याचे आश्वासन मा.श्री तहसीलदार साहेब देगलूर यांनी दिले आहे.
प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड हानेगाव.
