कोंढाळी पोलिसांची मोठी कारवाई, बाजारगाव झोपडपट्टी येथून गांजाची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

कोंढाळी पोलिसांची मोठी कारवाई, बाजारगाव झोपडपट्टी येथून गांजाची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

 

 

कोंढाळी पोलिसांनी अवैध अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात धडक पाऊल उचलत बाजारगाव परिसरात छापा टाकून एका महिलेकडून गांजा जप्त केला असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंधरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी कोंढाळी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, वार्ड क्रमांक दोन, बाजारगाव झोपडपट्टी येथे एक महिला स्वतःजवळ अमली पदार्थ गांजा बाळगून त्याची अवैध विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून संबंधित महिला आरोपीच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान घरात हिरव्या रंगाच्या वनस्पतीसारखी सुकलेली पाने, फुले, बिया आणि बोंडे असलेला गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी पंचासमक्ष चारशे बावीस ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची एकूण किंमत पाच हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी महिला आरोपीविरुद्ध कोंढाळी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *