कळमेश्वर हद्दीत वेस्ट रिसायकलिंग कंपनीला भीषण आग; पोलीस व देव्यांशी फाउंडेशनची टीम घटनास्थळी रवाना

*कळमेश्वर हद्दीत वेस्ट रिसायकलिंग कंपनीला भीषण आग; पोलीस व देव्यांशी फाउंडेशनची टीम घटनास्थळी रवाना*

रिपोटर,*जयश्री चव्हाण*

कळमेश्वर : कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामठी ते गोंडखैरी हायवे रोडवरील खडगाव परिसरात मन्सूर भाई यांच्या मालकीच्या वेस्ट रिसायकलिंग कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

 

आगीची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तसेच *आपत्कालीन मदतीसाठी सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांच्या मार्गदर्शनाखाली देव्यांशी फाउंडेशनची टीम ॲम्बुलन्ससह घटनास्थळी रवाना झाली*

 

आगीचे नेमके कारण, नुकसानीचा तपशील आणि या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळावरील पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

 

आपत्कालीन मदतीसाठी सदैव तत्पर!

 

*देव्यांशी फाउंडेशन टीम सामाजिक व रुग्णसेवक — मंगेश गमे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *