न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ साजरा

*न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ साजरा.

.

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 151 वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची 42 वी पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल व भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. ए. एम. कदम यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल व भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या लोहपुरुष महिला भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

उपस्थित सर्वांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल व भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके, डॉ. ए. एम. कदम, डॉ. पवन वासनिक, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. सुनिल पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण,

प्रा. सुरज बेले, प्रा. रजत सातपुते, प्रा. सुरज बनसोडे, डॉ. वाय. एम. काशिदे, प्रा‌. उषा किरवले, प्रा. अलका करंडे, प्रा. आगलावे, प्रा. विजय कांबळे, प्रा. एस. ए. चव्हाण, प्रा. गोरव गोरे,

तसेच श्री. संभाजी चोधरी, श्री. राजेंद्र केदारे, श्री. गजानन कऱ्हाळे, श्री. आशिष पतंगे,

श्री. अशोक कऱ्हाळे

विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *