अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; गोंडखैरी पारधी बेडा येथून ८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; गोंडखैरी पारधी बेडा येथून ८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

कळमेश्वर:

नागपूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कळमेश्वर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने मौजा गोंडखैरी पारधी बेडा येथे मोठी संयुक्त कारवाई केली. या मोहिमेदरम्यान दोन्ही विभागांनी मिळून एकूण ८ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच सावनेर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.

कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी पारधी बेडा परिसरात अवैध दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत कळमेश्वर पोलिसांनी १८ हजार ४०० लिटर सडवा, २१० लिटर मोहाफुलाची दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी १० आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७ गुन्हे नोंदवून २ हजार ६२० लिटर रसायनासह १ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही विभागांच्या या संयुक्त कारवाईत एकूण ८ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्व नाशवंत साहित्य घटनास्थळावरच पंच

नामा करून नष्ट करण्यात आले आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *