ही दिवाळी बळीराजाच्या घरी या उपक्रमास ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांचा प्रतिसाद

ही दिवाळी बळीराजाच्या घरी या उपक्रमास ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांचा प्रतिसाद

 

कार्यक्रमास उपस्थित राहून मदत करणार

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या यामुळे अनेक कुटुंब होरपळून निघाली आहेत. या परिस्थितीत बळीराजाच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, निराधार कुटुंब तसेच दिव्यांग कुटुंबात सेवासदन परिवार यावर्षीची दिवाळी साजरी करणार आहे. या कुटुंबांना किराणा किट आणि साडी चोळी सन्मानाने दिली जाणार आहे. या उपक्रमाबद्दल माहिती कळताच ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी या कार्यक्रमात मी सुद्धा सहभागी होत असल्याचे धनराज कदम यांना कळवले. शेतकरी कुटुंबाच्या या वाईट काळामध्ये मी त्यांच्यासोबत आहे … माझ्या परीने मी या कुटुंबासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करेल अशी पुष्पाताई चौधरी यांनी सांगितले.

ही परिस्थिती निराधार कुटुंबांना आधार देण्याची आहे. ज्या घरात खरोखरच दिवाळी होऊ शकत नाही त्या घरात आनंदाचा, प्रकाशाचा, आधाराचा आणि जिव्हाळ्याचा दिवा लावणे आवश्यक आहे. एकमेकांना आधार देणे आणि वाटून खाणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.

आणि म्हणूनच सेवा सदन परिवाराशी जोडलेल्या सर्वांनी एकत्रित येऊन लोकसभागातून ही दिवाळी साजरी करण्याचे ठरवले.

येत्या 6 नोव्हेंबर रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात सकाळी 11 वाजता 100 कुटुंबांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. या कुटुंबांना किराणा किट आणि साडीचोळी दिली जाणार आहे.

या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता , हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक कमलेशजी मीना , उपजिल्हाधिकारी समाधानजी घुटुकडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमात जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन मीरा कदम आणि धनराज कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *