घरफोडी करणारे दोन्ही आरोपी १२ तासांत जेरबंद!

*घरफोडी करणारे दोन्ही आरोपी १२ तासांत जेरबंद!*

 

*गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींकडून १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत*

 

करण्यात आले असून, चोरीला गेलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम अद्याप हस्तगत व्हायची आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

प्राप्त पोलीस माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र हरिचंद बागडकर (वय ३८, रा. सावित्रीबाई फुले वॉर्ड, कुंभारनगर, लाल पहाडी जवळ, गोंदिया) हे १० नोव्हेंबर २०२६ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता बेडरूममधील लोखंडी आलमारीच्या कप्प्यात ठेवलेले एक जोड सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे १२ हजार रुपये, तसेच १० हजार रुपये रोख असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. १००७/२०२६, कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरात शोधमोहीम राबवित असताना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी यश धर्मेंद्र वासनिक (वय १९, रा. लुबिनी चौक, कुंभारनगर, गोंदिया) आणि उदय ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (वय २२, रा. नाना चौक, कुंभारनगर, गोंदिया) या दोघांना ताब्यात घेतले.

दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. मात्र, उर्वरित १० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गोंदिया येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना जेरबंद केल्याने गोंदिया शहर पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत डी.बी. पथकाचे मपोअनि. प्रियांका बेस, सपो/कवलपालसिंग भाटिया, पोहवा/सुदेश ढेंबरे, पोहवा/निशिकांत लोंढासे, पोना/गंगाधर गुडे, पोलीस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजार, अजय बोपचे आणि राकेश डोंगरवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

गोंदिया शहर पोलिसांनी जलद तपास करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस विभागाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

गोंदिया जिल्हा प्रतिनिधि महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *