Adventure souls महाड संस्थेच्या माध्यमातून ऐतिहासिक लिंगाना सुळक्यावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिरंगा झेंडा फडकविण्यात आला
ही मोहीम दिनांक 24 जानेवारी रोजी पाने गावातून बोराट्याच्या नाळीतून सुरू करून सुळक्याच्या मधल्या गुहेत वस्ती करण्यात आली व दिनांक 25/01/2026 रोजी सकाळी नव्या दमाने पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली व सकाळी 11.15 मिनिटांनी सुळक्यावर तिरंगा झेंडा फडकवला सदर लिंगाना सुळका आरोहण मोहीम ही संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येते. सदर मोहिमेत रोप सेटअप विशाल खांबे यांनी केला
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक.विशाल मोहन खांबे, सदस्य प्रवीण किसान सपकाळ,सम्यक प्रवीण सपकाळ, रोशन रवींद्र सावंत, सचीन नथुराम सावंत,ओमकार माने असे सहा सदस्य सहभागी होते. ही मोहीम सुरुवातीपासून शेवट पर्यंत यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य म्हणजे संस्थेचे सचिव वैभव दत्तात्रेय शेडगे, उपाध्यक्ष रोहित उमाकांत भोईर, रजनीकांत माने, अमित गाडगीळ यांनी सपोर्ट टीम म्हणून काम केले
