वाकान शिवारात बिबट्याचा धुमाकूळ वन विभागाचे हातावर हात
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
महागाव वन विभाग काळी दौ.) वाकान परिसरातील भांदरी जंगलालगत असलेल्या शिवारात वाकान येथील शेतकरी भिमराव मंगु राठोड वय वर्ष ३५ हा शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेले असता काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी ३ वाजेच्या सुमारास भांदरी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळयाच्या कळपात झडप घालून बोकड एक ठार मारले यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले.सदर शेतकऱ्यांनी आरडा ओरड केली असता बिबट्याच्या भीतीने बोकडला बिबट्याच्या तावडीतून सोडवीने शक्य झाले नाही.या पुर्वीही देखील वाकान शिवारातील भांदरी जंगलात बिबट्याच्या हल्यात अनेक शेळयासह कालवड व इतर जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मात्र वनविभागाच्या वतीने दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त अघापही करन्यात आलेला नाही अनेक वेळा तक्रारी करुनही रिझल्ट शून्य असल्याने येथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कालच्या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागात दिली असून सदर घटनास्थळी वनरक्षक कोळी साहेब यांच्या सह वनविभागातील अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या बोकडचा पंचनामा केला असुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची ग्वाही दिली यावेळी वनविभागातील अधिकाऱ्यांसह रवि राठोड, टोपाज चव्हाण,इंदल आडे,प्रकाश खटारे, लक्ष्मण पारधी,आनिल पवार व शेतकरी भिमराव पवार यांची वोरड
