यवतमाळ/ कळंब पोलीस स्टेशन हद्दीत बाप-लेकांनी कुन्हाडीने तोडून हत्या केल्याची घटना घडली
कळंब पोलीस स्टेशन हद्दीत दोनोडा गावात मंगळवारी सकाळी 9.15 वाजताच्या दरम्या बाप लेकाच्या सहमतीने एकाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव दत्ता केशव चौधरी (वय 33) असे आहे. आशीष मारोती करलुके (वय 33) व त्याचे वडील मारोती करलुके (वय 55, रा. दोनोडा) असे आरोपी बापलेकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये आरोपी व मृतक यांच्यात भांडण झाले होते. त्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता व न्यायालयात खटला सुरु होता. ही जुनी केस सध्या न्यायालयाच्या बोर्डावर आली होती. बापलेक हे मृतकावर केसमधे सेटलमेंट करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते. आरोपीआशिष पोलिस भरतीची तयारी करत असल्याने नोकरीत अडचण येऊ नये म्हणून ते सेटलमेंट करण्यासाठी धमक्या देत होते. मात्र मृतकाने तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक व खटके उडत होते अशातच मंगळवारी ळवारी (ता. 24) सकाळी सुमारे 9.15 वाजताचे दरम्यान गावातच आरोपींनी धारदार कुन्हाडीने सपासप वार करुन त्यांची हत्या केली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सहहप्रकरणी मृतकाचे वडील केशव चौधरी वय 55 वर्ष यांनी कळबपोलिसात फिर्याद दिली असून कळब पोलिसांनी स्पॉट पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात ठेवला असून आरोपी वडील मारुती करलूके यांना ताब्यात घेतले असून आरोपी मुलगा आशिष मारुती करलुके वय 33 वर्ष हा घटनास्थळावर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे मानवी राग व सूड भावना किती भयानक परिणाम करु शकतात हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे
पुढील तपास कळम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत
प्रतिनिधी राम चव्हाण यवतमाळ
