.महागांव नगरपंचायतवर काँग्रेसचा गड कोसळला किंग मेकर ची मोठी जीत अखेर भाजपा चा झेंडा कार्यालयावर फडकला

महागांव नगरपंचायतवर काँग्रेसचा गड कोसळला किंग मेकर ची मोठी जीत अखेर भाजपा चा झेंडा कार्यालयावर फडकला

 

सौ.रंजना दीपक आडे अध्यक्षपदी विराजमान; काँग्रेसचे ‘पानिपत’, नितीनजी भूतडा ठरले महागाव नगरीचे ‘किंगमेकर

महागाव नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर मोठा सत्तांतराचा स्फोट झाला भारतीय जनता पक्ष ने सत्ता काबीज करत अध्यक्षपदी सौ. रंजना दीपक आडे यांची निवड निश्चित केली आहे. महागाव नगरपंचायत च्या अध्यक्षपदी भाजपच्या रंजना दीपक आडे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी जीत झाली आहे नगरपंचायत या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत आज विभागीय अधिकारी उमरखेड चे तक्काराम मुळे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळीसौ.रंजना दीपक पाडे यांना 12 नगरसेवकांनी समर्थन दर्शविल्यामुळे त्यांची अध्यक्षपदावर बहुमताने निवड करण्यात आली तसेच सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार स्वरूपांनी संतोष कोल्हेकर यांना केवळ पाच नगरसेवकांचे समर्थन मिळाल्यामुळे तो रंजना दीपक आडे यांनी अध्यक्षपदी निवड जाहीर होतात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना अभिवादन केले या घडामोडींमुळे काँग्रेस ला महागावात मोठा धक्का बसला असून स्थानिक पातळीवर याला ‘काँग्रेसचे पानिपत’ असे संबोधले जात आहे.

नगरपंचायतीतील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली, गुप्त बैठका आणि राजकीय डावपेचांचा शेवट अखेर भाजपचा विजय झाला. सत्तांतराच्या या नाट्यमय घडामोडींमध्ये यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनजी भूतडा यांची रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनेक सदस्यांना एकत्र आणत त्यांनी 1757 पूजिले 51 चा भाग तोडला आकडेमोड जुळवली आणि सत्तेचा तख्ता पलट घडवून आणला. त्यामुळेच त्यांना महागाव नगरीचे नव्हे तर यवतमाळ जिल्हा किंग मेकर च्या नावाने ‘ ओळखून संबोधले जात आहे.तर

काँग्रेसचा गड कोसळला

महागाव नगरपंचायतीत काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे मानले जात होते. मात्र अंतर्गत मतभेद, असंतोष आणि नेतृत्वातील विसंवाद यामुळे काँग्रेसची ताकद कमी होत गेली. याच संधीचा फायदा घेत भाजपने प्रभावी मोर्चेबांधणी केली. मतदानाच्या निर्णायक क्षणी काही सदस्यांनी भूमिका बदलल्याने समीकरणे पूर्णपणे फिरली आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.आता

रंजना आडे यांच्यावर विकासाची जबाबदारी

अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौ. रंजना दीपक आडे यांनी महागावच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देऊ,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष

 

Ct india News जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *