महागाव नगरपंचायतीच्या कारभारात शिस्त आणि वेग आणण्यासाठी नगराध्यकक्षा रंजना आडे यांची आज सकाळी धडक

महागाव नगरपंचायतीच्या कारभारात शिस्त आणि वेग आणण्यासाठी नगराध्यकक्षा रंजना आडे यांची आज सकाळी धडक

 

 

Ct india News यवतमाळ प्रतिनिधी महागांव

 

महागांव नगरपंचायतीच्या तपासणी करत प्रशासनाला नगराध्यक्ष रंजना आडे यांचा स्पष्ट संदेश दिला कामात कसूर चालणार नाही नगर अध्यक्षाची सकाळीच ॲक्शन मोड इंट्री

आज सकाळी नेमक्या 9.50 वाजता नगराध्यक्षांनी महागाव नगरपंचायतीत अचानक भेट देत कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. 10.10 वाजता उपस्थिती मस्टर स्वतः ताब्यात घेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक ताकीद देण्यात आली.

शिस्तबद्ध कामकाज हाच विकासाचा पाया आहे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.हलचल रजिस्टर अनिवार्य

कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हलचल रजिस्टरमध्ये वेळ व कारण नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारीवर भर देण्यात आला.

नगराध्यक्षांनी विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या

महागाव नगरपंचायतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव प्राधान्याने राबविणे

अग्निशामन दलासाठी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गतीमान करणे

ॲम्बुलन्स सेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे

अमृत जल योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठ्याची प्रभावी अंमलबजावणी गावातील साचलेला कचरा तात्काळ हटविण्याचे आदेश

नागरिकांच्या हितासाठी ठोस पावले

नगराध्यक्ष रंजना आडे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नगरपंचायतीच्या कामकाजात शिस्त येणार असून नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा मिळणार असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.महागावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्धार नगराध्यक्षांनी व माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनी व्यक्त केला आहे.नागरिकांचा विश्वास आणि विकासाची गती हेच आमचे ध्येय असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *