नॅचरल शुगर युनिट दोन गुंज क्षेत्रात वीजेच्या लंपडावाने बागायतदार त्रस्त

नॅचरल शुगर युनिट दोन गुंज क्षेत्रात वीजेच्या लंपडावाने बागायतदार त्रस्त

 

 

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव

 

सवना वाकोडी वेणि शिवारात ऊस पिकाची खुप मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आसुन ऊस पिकाला ईतर पिकांच्या तुलनेत पाणी जास्त प्रमाणात लागते त्यामुळे सहाजीकच विहीर, बोअरवेल,कॅनाल वरुन पाणी ऊपसा करुन सीचंन करावे लागते आणि या करिता पुरेसा वीज पुरवठा होणे आवश्यक आहे सवना शिवारात या करीता 33के.व्ही.केन्द्रसुध्दा कार्यरत आहे आणि सध्या परीस्थितीत ऊन्हाचा पारा चढता असल्याने ऊस पिकाची पाण्याची गरज वाढली आसतांना केंद्रांवर ओव्हरलोड येत असल्याने दर तासाला विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे परीसरातील बागायतदार वैतागून गेले आहेत सवना शिवारातील काही भाग गुंज येथील केंद्रावर जोडला गेला तीकडे सुध्दा सारखीच परिस्थिती असल्याने पिकांना पाण्याचा आजच खुप ताण सहन करावा लागत आहे आणखी पुढे तर काय परिस्थिती ऊदभवेल या चीतेंत शेतकरी आहेत

याबाबत गोविंदराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी केली आसता गुजं ते सवना येणारी लिकं लाईन व बॅक कॅपेसिटर चे काम आपुर्ण अवस्थेत असल्याने सबस्टेशन ओव्हरलोड होत असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे हे अपुर्ण आवस्थेतील काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सुचना करण्यात याव्यात व पुढील काळात होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा याचे दुष्परिणाम पुढील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावे लागतील हे नक्की तरी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करुन कळविण्यात येणार असल्याचे ऊस उत्पादक गोविंदराव देशमुख व ईतर शेतकऱ्यांनी आमचे प्रतिनिधी जवळ सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *