मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये पवार पब्लिक शाळेचे 28 सुवर्णपदक जिंकून यश मिळविले.
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली,पवार पब्लिक स्कूल, हिंगोली येथील विद्यार्थ्यांनी IMO परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या यशस्वी परंपरेला आणखी एकदा साध्य केले. या परीक्षेत शाळेतील तब्बल 28 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावत भव्य यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी गणित या विषयांमध्ये उत्कृष्ट प्रावीण्य सिद्ध केले विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेत दिले जाणारे दर्जेदार मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करून घेतली जात आहे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी सक्षम केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
