मातोश्री विद्यालय महागावच्या दोन संघांची राज्यस्तरावर झेप

मातोश्री विद्यालय महागावच्या दोन संघांची राज्यस्तरावर झेप

 

 

यवतमाळ प्रतिनिधी

 

 

 

शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित विभाग स्तरीय 17/19 वयाच्या च्या थ्रो बॉल संघात मुली मुलांच्या संघाने आपली खेळ कौशल्य प्रदर्शित करून विभागीय सामन्यात आपले स्थान पक्के केले राज्यस्तरावर आपली छाप पाडली. या खेळामध्ये खेळाडू ओम गावंडे कर्णधार वयोगट सतरा वर्षे कृष्णा वळसे, साहिल खोसे, रुद्रवीर राऊत, शिवा नेवारे, श्रीकृष्ण गावंडे, गौरव आखाडकर, गौरव गावंडे, सोहम पतके, पवन राऊत, सोहम राऊत, रोहित वानखेडे, या संघाने कार्य कुशलता व चेंडूची झेल अतिशय चुरशीने प्रदर्शित करून राज्यस्तरावर आपली झेप कायम केली . 19 वर्षे वयोगट संघाची कर्णधार म्हणून पल्लवी पहुरकर, प्रगती पहुरकर, जान्हवी नरवाडे, साक्षी कदम ,रोहिणी कदम, सानिका राऊत, उन्नती घोडे ,रोशनी घोडे, तेजस्विनी चव्हाण ,प्रशांती नरवाडे, समृद्धी कदम ,श्रुतिका येनकर यांचा समावेश होता या संघाची वाशिम अमरावती अकोला या संघाचा बॉल अचूक झेल करून आपल्या धुरंधर खेळाने यश संपादन केले व आपली राज्यस्तरासाठी निवड निश्चित केली. संघाचे सर्वत्र कौतुक होत असून खेळाडूंचे संस्थेच्या वतीने व कर्मचारी वृंदाच्या वतीने स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *