सारेगामा कलारत्न अवॉर्ड बालगंधर्व पुणे येथे प्रदान करणार

सारेगामा कलारत्न अवॉर्ड बालगंधर्व पुणे येथे प्रदान करणार- डॉ.संजय उत्तरवार हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली राज्यातील सारेगामा सांस्कृतिक समूह नागपूर, पुणे, मुंबई दिल्ली ह्यांच्या कडून महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना सारेगामा कलारत्न व कलागौरव २०२५ पुरस्काराने २० एप्रिल २०२६ ला सन्मानित करण्यात येणार अशी माहिती ग्रुप चे संचालक डॉ.एस.एस. उत्तरवार,व सौ वर्षा उत्तरवार ह्या आयोजकानी हिंगोलीत पत्रकारांना दिली. ते पुढे म्हणाले पत्रकारिता,समाजसेवा, साहित्य, कला,नाट्य, संगीत,गायन,ललित लेखन,काव्य,शिक्षण, संशोधन, तंत्रद्यान,चित्रकला,आदी क्षेत्रातील आर्यवैश्य समाजातील दिग्गज गुणवंतां ची माहिती, कुठलाही प्रस्ताव न मागवता शिफारसी विना सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर ने मूल्यमापन करून पुरस्कार जाहीर केले हे विशेष आहे.पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे आहेत.पत्रकारिता मधे आकाशवाणी दूरदर्शन प्रसार भारति चे सेवानिवृत प्रतिनिधी व शासनाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी डॉ.विजय निलावार हिंगोली व सुविख्यात व्यंगचित्रकार श्री बाबू गंजेवार कंधार,शैक्षणिक,सामाजिक,औद्योगिक आदी क्षेत्रातील व्यक्तिमत्व व शासनाचे कृषीभूषण पुरस्कारार्थी दीपक आसेगावकर पुसद,संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे अजिंक्य कोत्तावार यवतमाळ, चित्रकला मधे निपुण असलेले मिलिंद रतकंठीवार नागपूर ह्या गुणवंतांचा समावेश आहे.ह्या सर्वांना २०एप्रिल रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ ते ८ दरम्यान ” तुमने पुकारा और हम चले आये” ह्या रंगारंग संगीत मेजवानी व आदरातिथ्य सह सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर कडून व कला गौरव, कलारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात येणार आहे.सदरील कार्यक्रमाचा आनंद आर्य वैश्यसमाज बंधू भगिनीं साठी सन्मान फ्री पास हॉल वर घेऊन मिळणार आहे. ह्या उपक्रमामुळे मला व माझ्या ग्रुप ला धन्यता वाटत असल्याचं, सातासमुद्रा पलीकडे आपली कला प्रदर्शित करून नावलौकिक मिळवलेले गायक, आयोजक ग्रुप संचालक डॉ.संजय शंकर उत्तरवार,व संचालिका डॉ.सौ वर्षा उत्तरवार ह्यांनी हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना दिली.सारेगामा कल्चरल ग्रुप हा देश विदेशात श्रोत्यांना भावलेला कार्यक्रम असून असंख्य रसिक,चाहते जगभर आहेत. आमचे कार्यक्रम ऑनलाईन सगळ्या सोशल मीडिया वर उपलब्ध आहेत असेही उत्तरवार म्हणाले.ट्रॅफिक आदी मुळे होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व निमंत्रितानी आणि पुरस्कारार्थिनी बालगंधर्व रंगमंदिर येथे नियोजित वेळेवर पोचावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *