पोलिसांनी २ सराईत गुन्हेगारांना केले नागपूर जिल्ह्यातून हद्दपार

पोलिसांनी २ सराईत गुन्हेगारांना केले नागपूर जिल्ह्यातून हद्दपार!

 

मौदा (नागपूर):

अरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू व्यवसायात सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सुनील मोतीलाल ठाकरे आणि अल्ताफ चांद शेख अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांना ३ महिन्यांकरिता नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांनी हे हद्दपारीचे आदेश दिले आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि परिसरातील शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत.

 

हद्दपार करण्यात आलेले आरोपी:

१) सुनील मोतीलाल ठाकरे (वय ५५ वर्षे, रा. रेवरल, ता. मौदा)

२) अल्ताफ चांद शेख (वय ६३ वर्षे, रा. अरोली, ता. मौदा)

 

 

 या आरोपींवर अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

 त्यांच्या कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांना दारूचे व्यसन जडले असून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.

 वारंवार कारवाई करूनही आरोपींनी आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, जर हे दोन्ही आरोपी नागपूर ग्रामीण किंवा नागपूर जिल्हा हद्दीत दिसून आल्यास, नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *