मोहाफुलाची हातभट्टी उद्ध्वस्त; पाचगाव पोलिसांची चांपा शिवारात मोठी कारवाई!
नागपूर: पाचगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांपा बेडा शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठिकाण: मौजा चांपा बेडा शिवार, पाचगाव हद्द.
२०० लिटर मोहाफुल सडवा.
१०० लिटर उकळते रसायन.
४० लिटर तयार गावठी दारू.
प्लास्टिक आणि लोखंडी ड्रम.
एकूण किंमत: सुमारे ५४,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती भाग्यश्री धीरबस्सी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
पाचगाव आणि भिवापूर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील ‘रनिंग’ हातभट्ट्या पूर्णपणे नष्ट केल्या. नाशवंत मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून, संबंधित महिला आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
