गोंदिया ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४.३८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त!

गोंदिया ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४.३८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त!

 

गोंदिया: शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि अन्न पदार्थांच्या विक्रीविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख ३८ हजार ७७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास आमगाव रोडवरील फुलचूर येथील आंबेडकर पुतळ्याजवळ अवैध सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य जनार्दन नानोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.या कारवाईत आरोपी संतोष प्रेमचंद जैस्वाल (वय ४५ वर्षे, रा. फुलचूर) याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले.पोलिसांची सतर्कता आणि कौतुकास्पद कामगिरीसमाजाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध धंद्यांविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक येरमे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा टाकला.तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे गंभीर आजार लक्षात घेता, अशा माफियांच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. पोलिसांनी केवळ मुद्देमाल जप्त केला नाही, तर अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे.

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *