अनोळखी प्रेत आढळल्याने एकच खळबळ

अनोळखी प्रेत आढळल्याने एकच खळबळ

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत मौजे सावा शेत शिवारात अकोला ते हिंगोली रेल्वे पट्टीचे बाजूस लिंबाचे झाडांना अटकलेले एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असलेले, अर्ध टक्कल , कूरुळी दाढी व मिशा असलेले, उजव्या कानात बाळी ,गळ्यामध्ये हिरवा व लाल रंगाचा दोरा, उजव्या हाताचे पोटरीवर आकाश अंजली व फिकट रंगात शिल्पा नाव गोंदलेले तसेच बाजूला जमिनीवर पडलेलि एक धातूची अंगठी ज्यावर सिंह असलेली मिळून आले आहे. तसेच अंगामध्येकाळ्या व पांढऱ्या रंगाचे चौकडी फुल शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट वर्णनाची मिसिंग आपले पोलिस स्टेशन येथे दाखल असेल अथवा आपले हद्दीतील गावातील कोणी मिसिंग असेल तर संपर्क करावा. माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

 

पोलिस निरीक्षक

विष्णुकांत गुट्टे मो. नं 8830564618

पोउपनि घुले 7709534334

Hc/63 जमदाडे 8788143796

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *