*प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारे २ आरोपी केळवद पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील सालई नांदागोमुख रोडवर पोलिसांनी नाकाबंदी करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ८ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २३ जून २०२६ रोजी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयास्पद टोयोटा इनोव्हा कार (क्र. एम एच ३१ डी के ३७१७) थांबवून तपासणी केली असता, त्यात २२९.६ किलोग्राम प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी १,९३,८९० रुपये किमतीचा तंबाखू, ६ लाख रुपयांची कार आणि १५ हजार रुपयांचे दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपी रवींद्र काशिनाथ श्रीरंगे (वय ४४, रा. सक्करदरा, नागपूर) आणि निखील रमेशलाल ममतानी (वय ३२, रा. जरीपटका, नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. मानवी जीवितास अपायकारक असलेल्या या प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक व वाहतूक केल्याप्रकाने केळवद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
