कळमेश्वर पोलिसांच्या ‘रेकॉर्डवरील ३८ सराईत आरोपींची पोलीस ठाण्यात परेड

कळमेश्वर पोलिसांच्या ‘रेकॉर्डवरील ३८ सराईत आरोपींची पोलीस ठाण्यात परेड

 

गोंडखैरी : कळमेश्वर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई करत शनिवारी (४ जुलै) पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील ३८ सराईत आरोपींची परेड घेतली. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, महिला व बालकांवरील अत्याचार, तसेच अवैध दारू, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील ३८ आरोपींना पोलीस ठाण्यात हजर करून त्यांची परेड घेण्यात आली. यावेळी आरोपींना भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याचा इशारा देण्यात आला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज काळबांडे यांनी स्पष्ट केले.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *