नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार… 

नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार…

विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या आणि वसमत विधानसभा क्षेत्रात नियुक्ती मिळालेल्या सर्व केंद्रप्रमुखांचा सत्कार मा. आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने करण्यात आला.

शिक्षणाला गती यावी, शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात आणि विधानसभा क्षेत्राचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने विभागीय परीक्षेमार्फत भरण्यात आलेल्या केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. विश्राम गृह वसमत येथे झालेल्या कार्यक्रमात सर्व कार्यालय प्रमुख , पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कन्या वसमत चे केंद्रप्रमुख सुनिल अनकाडे, शाखा वसमतचे केंद्रप्रमुख श्रीनिवास कोल्हाळे, नुतनचे अमोल भारती, कुरंदा केंद्रप्रमुख संतोष कोंपलवार, हट्टा केंद्राचे कमलकिशोर कुलकर्णी, नहाद केंद्राचे सुरेश वाघमारे, उंडेगाव केंद्राचे यादव गायकवाड आणि पुरजळ केंद्राचे सय्यद सादेक यांचा सत्कार करण्यात आला.

काम करताना सर्वांना प्रेरणा मिळावी आणि माझ्या मतदारसंघात प्रत्येक कर्मचार्यांचा सक्रिय सहभाग असावा अशी सदिच्छा आमदार महोदयांनी व्यक्त केली.

यावेळी शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक, संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

 

छाया नागेश चव्हाण वसमत

प्रतिनिधी सचिन घारपुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *