ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन ८-९ ऑगस्टला वडगाव मावळमध्ये:
राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार.
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय अभ्यास वर्ग व अधिवेशन याचे आयोजन शनिवार ८ ऑगस्ट आणि रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी शिवराज पॅलेस, वडगाव मावळ, मुंबई-पुणे हायवे, ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आले आहे.ह्यासाठी साधकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली असल्याची माहिती राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड ह्यांनी दिली.
“”ग्राहक देवो भव”” हे ब्रीद साकारून ग्राहक हा राजा च आहे हे समजून राज्यस्तरीय अभ्यास वर्ग आयोजिला आहे असेही लाड म्हणाले.
अधिवेशनाचे उद्घाटन राज्य ग्राहक तक्रार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड रहाणार आहेत.
“प्रमुख अतिथींची उपस्थिती”
या दोन दिवसीय अधिवेशनाला राज्यभरातून ग्राहक पंचायत पदाधिकारी ,सदस्य साधक मंडळी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून
आमदार सुनिल आण्णा शेळके, मावळ विधानसभा,
माजी सहकार मंत्री आ.सुभाषबापू देशमुख, सोलापूर
राजेंद्र पवार संचालक, मानव संसाधन महावितरण मुंबई,
माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,
माजी अर्थ व नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार
सुविख्यात उद्योगपती कॅप्टन विलासराव कात्रे, आदी मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.ह्या अगोदरही राज्यातील विविध विभागात राज्य स्तरीय अधिवेशन झाल्याने साधक पदाधिकारी ह्यांना मोठी ऊर्जा मिळते असे राज्य महासचिव अरुण वाघमारे ह्यांनी म्हटलं आहे.ते पुढे म्हणाले की दर अधिवेशनात ग्राहक हितार्थ उल्लेखनीय सेवा कार्य केलेल्यांना
राज्यस्तरीय पुरस्कार
देऊन गौरवण्यात येणार आहे.ह्यात
रामराव जगदाळे यांना समाजभूषण पुरस्कार
अर्थव्यवस्थेचे पंचप्राण राज्यस्तरीय पुरस्कार अंतर्गत
श्रमिक क्षेत्रातील विठोबा लच्छाराम ध्यानदास नाशिक,
व्यापारी क्षेत्रात श्रीमती सुविधी सुधीर जयस्वाल, नागपूर,
शेतकरी क्षेत्रात पांडुरंग कुंडलिक बरळ पुणे,
उद्योजक क्षेत्रात रयत आरोग्य मंडळ नांदेड,
ग्राहक क्षेत्रात सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कोकण,
उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार सर्वश्री नितीन मुकेवार नागपूर, उदय अग्निहोत्री नाशिक, विष्णूप्रताप दळवी ,कोकण, प्रा. रावसाहेब तानाजी गर्जे , छ. संभाजीनगर, रवींद्र विठ्ठलराव ठाकरे , अमरावती, बाळासाहेब चव्हाण, पुणे ह्या मान्यवरांना त्यांच्या कार्य गौरवार्थ प्रदान केले जाणार आहेत.
“”दोन दिवसीय नियोजन””
शनिवार ८ ऑगस्ट ला दुपारी २ ते रात्री १० पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल आहे ह्यात
दुपारी २ ते ३ नोंदणी, ३ ते ५ उद्घाटन सत्र यात स्वागत,ग्राहक गीत, दीप प्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण होईल.
सायंकाळी अन्न व औषध प्रशासन, शेतकरी ग्राहक प्रबोधन ह्यावर सर्जेराव जाधव प्रबोधन करणार आहेत.जिल्हावार अहवाल सादरीकरण आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जीवनावरील ध्वनिचित्रफित चे गजेंद्र क्षीरसागर सादरीकरण करणार आहेत
रविवार ९ ऑगस्ट ला सकाळी ७.१५ ते दुपारी ३ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजिले आहेत.
सकाळी चिंतन,त्यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची त्रिसुत्री व कार्यपद्धती ह्यावर एस. एन.पाटील, ग्राहक गाऱ्हाणी निवारण मंच ह्यावर श्री. महेंद्र दिवाकर.
त्यानंतर सजग विद्यार्थी ग्राहक अभियान वर सौ. मेधाताई कुलकर्णी, कार्यकर्ता कसा असावा ह्यावर प्रा. चंद्रकांत डागा, मुंबई नर्सिंग कायदा डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सायबर क्राईम श्री. योगेश ठाणगे, अमृत योजना आणि ग्राहक चळवळ विजय बिंदुमाधव जोशी, ग्राहक संरक्षण परिषद आणि ग्राहक आयोग ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत पात्रीकर यांची व्याख्याने होणार आहेत.ह्याच रोजी
दुपारी २ ते ३ समारोह सत्र डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली होऊन अधिवेशनाचा समारोप होईल.राज्यात अद्याप पावेतो दरवर्षी आयोजित अधिवेशने व अभ्यासवर्ग संपन्न करण्या साठी आयोजकत्व पत्करलेल्या जिल्हा शाखा आणि राज्य ग्राहक पंचायत ह्यांनी केलेलं प्रयत्न वाखाणले गेल्याने
या अधिवेशनाचे आयोजन अशोकशेठ अग्रवाल अध्यक्ष पुणे विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी, पुणे आणि पुणे महानगर कार्यकारिणी करत आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार हिंगोली ह्यांनी म्हटले आहे.अधिवेशनाचे
निमंत्रक डॉ. विजय लाड राज्यअध्यक्ष,अरुण वाघमारे राज्य महासचिव सचिव,मेधाताई कुलकर्णी सह संघटक, प्रा. एस. एन.पाटीलराज्य सहसचिव, यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकारी,जिल्हा शाखा, मागील तीन महिन्यापासून परिश्रम घेत आहेत त्यामुळे पुणे विभाग,पुणे जिल्हा व महानगर कार्यकारिणी, आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्व निमंत्रितानी,संबंधितांनी अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.ज्या साधकांनी नोंदणी केली नाही त्यांनी अधिवेशनात येणे टाळावे पण जे आपली राहण्याची व्यवस्था स्वतः करू शकतात अश्याना ऐन वेळी प्रसंगी प्रवेश देण्यात येईल व खानपान व्यवस्था करण्याचा प्रयत्न केल्या जाऊ शकतो असेही डॉ.लाड ह्यांनी स्पष्ट केले.
