वसमत येथे काँग्रेस पार्टी, हिंगोली जिल्हा (सामाजिक न्याय विभाग)

वसमत येथे काँग्रेस पार्टी, हिंगोली जिल्हा

(सामाजिक न्याय विभाग)

श्री. विनोद अंबादास चव्हाण

(उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, हिंगोली)

दि. १२/०८/२०२६

प्रति,

मा. मुख्याधिकारी साहेब,

नगर परिषद, वसमत, जि. हिंगोली.

विषय : गौतम नगर येथील पुरातन काळातील जुन्या विहिरीतील गाळ उपसण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आम्ही गौतम नगर परिसरातील समस्त रहिवासी या पत्राद्वारे आपले नम्र विनंतीपूर्वक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, वसमत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील गौतम नगर भागात एक ऐतिहासिक व पुरातन काळातील जुनी विहीर आहे. ही विहीर आमच्या परिसरातील नागरिकांसाठी पाण्याचा एक मुख्य आणि पारंपरिक स्रोत राहिलेली आहे.

परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरीची योग्य स्वच्छता न झाल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा आणि पालापाचोळा साचला आहे. त्यामुळे विहिरीतील पाण्याचे जीवन झरे देखील पूर्णपणे बुजलेले आहेत. सध्या विहिरीत गाळ साचून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच, येत्या काळात परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी या विहिरीचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर या विहिरीतील गाळ उपसून तिची संपूर्ण स्वच्छता केली, तर परिसरातील शेकडो नागरिकांना वापरासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.

तरी प्रशासनाने जनहितार्थ आणि आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन गौतम नगर येथील या पुरातन विहिरीतील गाळ उपसण्याचे काम तातडीने मंजूर करून ते सुरू करावे, ही नम्र विनंती.

सोबत नागरिकांच्या स्वाक्षरीची यादी.

आपले नम्र,

(विनोद अंबादास चव्हाण)

उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP-अजित पवार गट)

व समस्त नागरिक, गौतम नगर, वसमत. निवेदनकर्ते

विनोद चव्हाण, तथागत गवळी, मुख्तार भाई, रमेश वाघमारे, राजरतन वावळे, हसोजी सूर्यवंशी, कपिल मोरे, सूरज जोगदंड, विनोद खंदारे, मारोती पंडित, विकी जोंधळे, उत्तम गजभार, राजु गोलेर, शुभम गवळी, सुहास जोगदंड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते

छाया नागेश चव्हाण

प्रतिनिधी सचिन घारपुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *