राष्ट्रीय समाज पक्षाच्या नायगांव तालुका अध्यक्ष पदी अशोक कुमनाळे यांची निवड.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नायगांव तालुका अध्यक्ष पदी अशोक कुमनाळे यांची निवड.

कुमनाळे यांच्या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

नायगांव (17ऑगस्ट) राष्ट्रीय समाज पक्ष नायगांव तालुका अध्यक्ष म्हणून देगाव येथील युवा नेतृत्व अशोक आर कुमनाळे यांची निवड करण्यात आल्याने त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नायगांव तालुका अध्यक्ष पदी निवड झालेले युवा नेतृत्व अशोक कुमनाळे यांची सामाजिक जाणिव , समाजकारणात काम करण्याची कार्यपद्धती, जनमानसाप्रती असलेला सलोखा लक्षात घेऊन त्यांची 12 ऑगस्ट 2026 रोजी निवड करण्यात आल्याचे पत्र रास पा जिल्हा अध्यक्ष मा. शिवकुमार देवकते यांनी अशोक कुमनाळे यांना देऊन त्यांचे स्वागत केले आहे. संस्थापक नामदार महादेवजी जानकर आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंग अप्पा किन्नर यांच्या विचारसरणीच्या रासप पक्षात आपली राजकीय,सामाजिक तळमळ पाहता पक्षाच्या घटनेनुसार तालुका अध्यक्ष पदी झालेली ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली असून आपण आपल्या कार्यकाळात पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करालच येणाऱ्या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्रात रासपाला यशस्वी करून आपली निवड सार्थ ठरवा अशी अपेक्षा बाळगतो असे निवड पत्रात निवेदित केले आहे. पत्रकार (वार्ताहर) म्हणून सामाजिक कार्य करणारे अशोक कुमनाळे यांच्या निवडीचे कार्यकर्ते व मित्रमंडळी कडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *