आयूका तर्फे न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे लायगो इंडिया पायथॉन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन”*

*”आयूका तर्फे न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे लायगो इंडिया पायथॉन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन”*

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

 

हिंगोली,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयात आयूका तर्फे लायगो इंडिया दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ एन.एस.सोळंके सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री सौरभ साळूंखे,(समन्वयक लायगो इंडिया) श्रीमती स्वराली जगदाळे (समन्वयक आयुका) श्री शुभम पौळ (सह समन्वयक) सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.श्री सौरभ साळूंखे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या हिंगोली जिल्ह्यात सन २०२२ मध्ये लायगो इंडिया प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.या प्रकल्पा अंतर्गत गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यात येतो.याबाबत सविस्तर माहिती दिली.श्रीमती स्वराली जगदाळे यांनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.अध्य‌क्षीय समारोप करताना मा.प्राचार्य डॉ.एन.एस.सोळंके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करावा.आपल्या आकाशगंगेतील ग्रहांच्या अभ्यास करण्यासाठी गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास उपयुक्त ठरतो.या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करियर व संशोधन करण्यास वाव असल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.काळबांडे एस.आर.,तर आभार प्रदर्शन प्रा.कांबळे यांनी केले.याप्रसंगी प्रा. किरवले यु.डी., प्रा.शिर्के एस.पी., प्रा.करंडे ए.ए.,प्रा.तापडिया व्हि.जे., डॉ.काशिदे वाय.एम., डॉ.कदम ए.एम., प्रा.चव्हाण बी.बी., प्रा.काशिदे एस.एस., डॉ.पुरी के.एल.,प्रा.शेख जुनेद, डॉ.खंदारे एस. वाय.,प्रा.गोरे जी.यु., डॉ.वासनिक पी.एस.,प्रा.सातपूते आर. ए., डॉ.कोल्हे आर. डी., प्रा.चव्हाण एस.ए., डॉ.पाटील एस.जी.,प्रा.अवचार ए.ए. डॉ.मापारी एस.के.,प्रा.खर्जुले एस.ए.,प्रा.लेमले एम.जी.,श्री.शिंदे गजानन, श्री.शेरु, श्री.अल्लादिन पठाण, श्री.पाशू, श्री.आशिष पतंगे श्री दिपके एम.,विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *