शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत भव्य धडक मोर्चा; रोहित पवार आणि चरण वाघमारे

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत भव्य धडक मोर्चा; रोहित पवार आणि चरण वाघमारे यांचे नेतृत्वमोहाडी:शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी मोहाडी येथे एक भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ‘अन्नदात्यासाठी आंदोलन’ आणि ‘शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी चला मोहाडी!’ अशी हाक देत आमदार रोहितदादा पवार आणि माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.हा मोर्चा दुपारी १२ वाजता चंडेश्वरी मंदिर ते तहसील कार्यालय, मोहाडी असा काढण्यात येणार असून, याद्वारे जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे कान टोचले जाणार आहेत.आंदोलनातील प्रमुख मागण्या:या आंदोलनादरम्यान खालील महत्त्वाच्या मागण्यांवर भर दिला जाणार आहे:धान उत्पादक शेतकरी: धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बोनस मिळालाच पाहिजे.वीज पुरवठा: शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास अखंडित वीज पुरवावी.कर्जमाफी व प्रोत्साहन: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांची प्रोत्साहन राशी तात्काळ मिळावी, तसेच सर्व शेकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी.उसाचा दर: उसाच्या दरामध्ये योग्य वाढ करण्यात यावी.विद्यार्थी व तरुण: आदिवासी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.महिला न्याय: महिलांना योग्य न्याय आणि त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत.आमदार रोहित पवार आणि माजी आमदार मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे चरणभाऊ वाघमारे यांनी या भागातील सर्व शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांना आपल्या हक्कांच्या लढ्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने आणि एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *