पूर्व विदर्भ पीठ नागपुर येथून नाणीज साठी 11 सप्टें,ला वसुंधरा पायी दिंडी ची सुरुवात.

( अध्यात्म व पर्यावरण रक्षणाचा नामगजरासह संदेश देत हजारो भाविक होणार सहभागी )

नागपूर

जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने ह्या वर्षी सुद्धा पूर्व विदर्भ पीठ नागपूरवरून 11 सप्टेंबरला वसुंधरा पायी दिंडीची सुरुवात कामठी तालुक्यातील नेरला पिठावरून जल्लोषात होत आहे. युवा संघटनेच्या बाईक रॅलीने हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी उपपिठावर पोहोचणार आहे.

दिनांक 12 सप्टें,ला जगद्गुरुश्री यांच्या पिठावरील सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पूजन विधि करून यजमानांच्या हस्ते रथावर सिद्ध पादुका स्वार करण्यात येतील. नाम गजराच्या जयघोषाने ही वसुंधरा पायी दिंडी अध्यात्म आणि पर्यावरण रक्षण असा संदेश देत 40 दिवसाच्या प्रवास करीत 21 ऑक्टो, ला जगद्गुरुश्री यांच्या जन्मोत्सवनिमित्त वारी उत्सवात सहभागी होणार. या दिंडीत हजारो धाम यात्रीसह भाविक भक्त व सेवकांची उपस्थिती असणार आहे प्रवासात ग्राम स्वच्छता, पर्यावरण रक्षण असा संदेश देत प्रत्यक्ष वृक्षारोपण करून मार्गस्थ होणार आहे.

दररोज साधारण 20 ते 25 किलोमीटरच्या अंतर पायी चालणार असून ठीक ठिकाणी चहा नाश्ता, महाप्रसाद, पिण्याचे शुद्ध पाणी ची व्यवस्था असणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर व फिरते शौचालय याची सुद्धा व्यवस्था असणार आहे.अध्यात्म आणि पर्यावरण रक्षण संदेश देणाऱ्या आणि सिद्धपादुकांचे वास्तव्य असणाऱ्या या वसुंधरा पायी दिंडीत भाविक भक्त आणि सेवकांनी सहभागी होऊन सेवा साधना आणि आचरण या त्रिसूत्रीची आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घ्यावी असे आवाहन, पिठ प्रमुख भोयर, व्यवस्थापक परब, दिंडीप्रमुख नवरंग मेश्राम यांनी केले.पूर्व विदर्भ पीठ नागपुर येथून नाणीज साठी 11 सप्टें,ला वसुंधरा पायी दिंडी ची सुरुवात.

( अध्यात्म व पर्यावरण रक्षणाचा नामगजरासह संदेश देत हजारो भाविक होणार सहभागी )

नागपूर

जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने ह्या वर्षी सुद्धा पूर्व विदर्भ पीठ नागपूरवरून 11 सप्टेंबरला वसुंधरा पायी दिंडीची सुरुवात कामठी तालुक्यातील नेरला पिठावरून जल्लोषात होत आहे. युवा संघटनेच्या बाईक रॅलीने हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी उपपिठावर पोहोचणार आहे.

दिनांक 12 सप्टें,ला जगद्गुरुश्री यांच्या पिठावरील सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पूजन विधि करून यजमानांच्या हस्ते रथावर सिद्ध पादुका स्वार करण्यात येतील. नाम गजराच्या जयघोषाने ही वसुंधरा पायी दिंडी अध्यात्म आणि पर्यावरण रक्षण असा संदेश देत 40 दिवसाच्या प्रवास करीत 21 ऑक्टो, ला जगद्गुरुश्री यांच्या जन्मोत्सवनिमित्त वारी उत्सवात सहभागी होणार. या दिंडीत हजारो धाम यात्रीसह भाविक भक्त व सेवकांची उपस्थिती असणार आहे प्रवासात ग्राम स्वच्छता, पर्यावरण रक्षण असा संदेश देत प्रत्यक्ष वृक्षारोपण करून मार्गस्थ होणार आहे.

दररोज साधारण 20 ते 25 किलोमीटरच्या अंतर पायी चालणार असून ठीक ठिकाणी चहा नाश्ता, महाप्रसाद, पिण्याचे शुद्ध पाणी ची व्यवस्था असणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर व फिरते शौचालय याची सुद्धा व्यवस्था असणार आहे.अध्यात्म आणि पर्यावरण रक्षण संदेश देणाऱ्या आणि सिद्धपादुकांचे वास्तव्य असणाऱ्या या वसुंधरा पायी दिंडीत भाविक भक्त आणि सेवकांनी सहभागी होऊन सेवा साधना आणि आचरण या त्रिसूत्रीची आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घ्यावी असे आवाहन, पिठ प्रमुख भोयर, व्यवस्थापक परब, दिंडीप्रमुख नवरंग मेश्राम यांनी केले.

गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *