गणेशोत्सवासाठी महिलांनी साकारलेल्या मूर्तींची विक्री सुरू

गणेशोत्सवासाठी महिलांनी साकारलेल्या मूर्तींची विक्री सुरू

 

 

 

 

सोयगाव, तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

दि. ११ : गणेशोत्सवानिमित्त आमखेडा येथील पूर्णिमा महिला बचत गट व उमेद अभियानांतर्गत महिलांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींच्या विक्री केंद्राचे सोयगाव बसस्थानकासमोर उद्घाटन करण्यात आले. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांच्या हस्ते या विक्री केंद्राचे उद्घाटन झाले.

 

महिलांनी स्वतःच्या कौशल्यातून तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. गणेशभक्तांनी या मूर्ती खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

 

यावेळी विस्तार अधिकारी अशोक दौड, ऋषिकेश देशमुख, विष्णू मापारी, सीता मापारी, सोनाली मोरे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

 

फोटो ओळ : सोयगाव बसस्थानकासमोर महिला बचत गटाने तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *