रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग; वाशिम विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

*रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग; वाशिम विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या*

*आगामी जि.प. – पं.स. निवडणुकांसाठी ‘संघटन सृजन मोहीम’ आणि ‘संवाद दौरा’*

 

*वाशिम / उमरखेड :* आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रिपब्लिकन सेनेने जिल्ह्यात ‘संघटन सृजन मोहीम’ प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षाशी एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांना विधानसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.

 

वाशिम येथे सतीश खोडके यांच्या वतीने आयोजित संवाद दौरा व पक्ष प्रवेश सोहळा यवतमाळ-वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख संतोष ठमके, उमरखेड विधानसभा अध्यक्ष गौतम नवसागरे, उपाध्यक्ष शुद्धोधन दिवेकर आणि संघटक संदीप राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल सुर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन विश्वनाथ सावले यांनी केले.

 

यावेळी सर्वानुमते *सतीश खोडके यांची वाशिम विधानसभा अध्यक्षपदी, विश्वनाथ सावले यांची विधानसभा सचिवपदी तर मोहनराज दुतोंडे यांची संघटकपदी* नियुक्ती करण्यात आली.

 

अध्यक्षीय भाषणात सुनिल पाटील चिंचोलकर यांनी पक्षाची रणनीती स्पष्ट केली. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीने लढवणार असून त्यासाठी कटिबद्ध योजना व ठोस कृती आराखडा तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी लवकरच दोन्ही जिल्ह्यांत ‘रिपब्लिकन सेना संवाद दौरा’ आयोजित केला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

रिपब्लिकन सेनेने केवळ राजकीय हेतू न ठेवता सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे प्रश्न, शेतीमालाला योग्य भाव, कामगारांचे रखडलेले मानधन आणि विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप व शैक्षणिक अडचणी सोडवणे हाच पक्षाचा मुख्य अजेंडा राहणार असल्याचे चिंचोलकर यांनी सांगितले.

 

*उमरखेड तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख*

*संपर्क : 9067934036*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *