तोंडापूरच्या जैन विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा
———————————–
प्रतिनिधी संतोष गर्दे
तोंडापूर ता जामनेर
येथील श्रीमती र.सू. जैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक – पालक -विद्यार्थी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी चौधरी हे होते. सहविचार सभेमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यामध्ये शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली. तोंडापूर पंचक्रोशीतील सर्व पालक 100% उपस्थित होते. सहविचार सभेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पी डी. रोनखेडे यांनी केले. इयत्ता दहावी वर्गशिक्षक या नात्याने एस.एस. देशमुख यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी.पाटील तसेच आभार वाय एम पाटील यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक के एस माळी सर, सर्व शिक्षकांनी सहकार्य केले..
