न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे आज दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांची 123 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. वाय. एम. काशिदे यांनी कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
उपस्थित सर्वांनी कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी आदरणीय प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके, प्रा. डॉ. वाय. एम. काशिदे, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. पवन वासनिक, डॉ. सुनिल पाटील, डॉ. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, डॉ. गोपाल जाधव, डॉ. के. एल. पुरी, प्रा. विजय कांबळे, प्रा. रजत सातपुते, प्रा. श्याम खर्जुले, प्रा. एस. ए. चव्हाण, प्रा. गौरव गोरे, प्रा. जुनेद शेख, प्रा. स्नेहा शिर्के, प्रा. अलका करंडे, प्रा. तापडिया
तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. अशोक कऱ्हाळे विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
