जागतिक हृदय दिनानिमित्त हार्ट प्लस हॉस्पिटलतर्फे विशेष तपासणी शिबिर
जळगाव : जागतिक हृदय दिनानिमित्त नागरिकांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हार्ट प्लस हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात ECG मोफत, तर आवश्यकतेनुसार 2D Echo केवळ ₹५०० मध्ये उपलब्ध आहे. तसेच लिपिड प्रोफाइल, HbA1c आणि शुगर तपासणीची सुविधाही देण्यात आली आहे. नोंदणी शुल्क ₹१०० आहे.
छातीत दुखणे, धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवणे यांसारखी लक्षणे असल्यास दुर्लक्ष न करता तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
ठिकाण : हार्ट प्लस हॉस्पिटल, व्ही.एफ.एस.एल. ऑफिससमोर, जळगाव. प्रतिनिधी राहुल चौधरी
