लखनऊ, उत्तर प्रदेश | पसमंदा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती

लखनऊ, उत्तर प्रदेश | पसमंदा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमास उपस्थिती

 

 

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

 

आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे आयोजित पसमंदा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्तर प्रदेश राज्यातील पसमंदा मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व समाजबांधवांना संबोधित केले.

 

यावेळी उत्तर प्रदेश सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री दानिश अन्सारीजी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो जी (राज्यमंत्री दर्जा), राष्ट्रीय अल्पसंख्यांक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष शाहिद अख्तर जी (राज्यमंत्री दर्जा), भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते गुरुप्रकाश पासवान जी, तसेच कार्यक्रमाचे आयोजक व पसमंदा मुस्लिम मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष जावेद मलिक जी यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने पसमंदा मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

 

पसमंदा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी संघटितपणे काम करण्याची गरज असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे हेच आपले ध्येय आहे.

 

या कार्यक्रमातून पसमंदा समाजाच्या हक्क, विकास आणि सन्मानासाठीची एकजूट आणि सकारात्मक विचार अधिक बळकट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *