*विषय: बाळापूर मतदार संघाचे आमदार श्री. नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी आमचे समाज बांधव व राज्याचे महसूल

 

 

*विषय: बाळापूर मतदार संघाचे आमदार श्री. नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी आमचे समाज बांधव व राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याबद्दल केलेल्या बेताल व बदनामीकारक वक्तव्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करणेबाबत..*

 

महोदय,

 

आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जबाबदार पदाधिकारी असून आम्ही प्रत्यक्ष हजर राहून आपणास निवेदन देतो की, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.नितीन देशमुख यांनी शासकीय कार्यालयात घुसून शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करत,महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री व आमचे समाज बांधव मा.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याबद्दल *”बावनकुळे मंत्री नाही,तो ठेकेदार आहे”* असे अत्यंत अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केले आहे..

 

एका जबाबदार आमदाराने असे वक्तव्य करणे म्हणजे पदाचा गैरवापर असून शासकीय कामात अडथळा आहे.मा. बावनकुळे साहेब हे ओबीसी समाजाचे व आमच्या तेली समाजाचे जेष्ठ नेते आहेत,संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा सन्मान आहे,ते आमच्या समाजाचे मानबिंदू आहेत. त्यांच्याबद्दल असे जातीवाचक/द्वेषपूर्ण बोलणे हा समस्त तेली समाजाचा अपमान करणारे, त्यांच्या भावना दुखावणारे विधान असून त्यांच्या या विधानामुळे समाजात अशांतता व असंतोष पसरला आहे..

 

या निवेदनात मार्फत आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, आमच्या निम्न मागण्या आपण तातडीने मान्य कराव्या..

 

*आमच्या मागण्या :-*

 

१) आमदार नितीन देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा,मंत्र्याची बदनामी व धमकी दिल्याबद्दल तात्काळ FIR दाखल करावा..

 

२) सदर व्हिडिओची चौकशी करून तो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी..

 

सबब माननीय आमदार श्री नितीन देशमुख यांचे सह संबंधित व्यक्तींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यातील तेली समाज व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी हे आपल्या कार्यालयासमोर धरणा आंदोलन तथा निषेधार्थ निदर्शने करतील याची कृपया नोंद घ्यावी..

 

आपल्या सकारात्मक कार्यवाहीच्या अपेक्षित..

 

आपले नम्र..

 

पदाधिकारीचे नाव पद व सही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *