आदिवासी समाजाच्या कन्येची शैक्षणिक भरारी; हर्षाली करपाते बी.ए.एम.एस. अंतिम परीक्षेत उत्तीर्ण

आदिवासी समाजाच्या कन्येची शैक्षणिक भरारी; हर्षाली करपाते बी.ए.एम.एस. अंतिम परीक्षेत उत्तीर्ण

 

 

 

आदिवासी समाजातील कु. हर्षाली दयारामजी करपाते हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी) अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी हर्षालीने घेतलेली मेहनत आज फळाला आली आहे. तिच्या या यशामागे वडील श्री. दयारामजी करपाते यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि कुटुंबाने दिलेला पाठिंबा मोलाचा ठरला आहे. मुलीने उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, या स्वप्नाला तिने आपल्या कर्तृत्वातून यशस्वी दिशा दिली आहे.

 

आदिवासी समाजातील मुलींसाठी हर्षालीचे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. परिस्थिती कोणतीही असो, जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची आवड असेल तर यशाचे शिखर गाठता येते, हे तिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

 

कु. हर्षाली करपाते हिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *