हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरणार कुस्तीचा आखाडा; २४ नोव्हेंबरला भव्य कुस्त्यांचे आयोजन..
..
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी .. संतोष गर्दे
…
सावळदबारा परिसरात शालीवस्ता बाबा उर्स व नागोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल; नामांकित पैलवानांच्या लढतींची रंगत होणार आहेत
उर्स व नागोबा यात्रा निमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सालीवस्तात बाबा संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या या धार्मिक व पारंपरिक उत्सवाच्या निमित्ताने कुस्तीप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. परिसरातील नामांकित तसेच होतकरू पैलवानांना आपले कुस्ती कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.कुस्ती स्पर्धेसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. कुस्ती खेळताना पैलवानांनी स्वतःच्या जीविताची व सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील.मुलीची कुस्ती लावण्यात येणार नाही , कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी ठरलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आखाड्यामध्ये शिस्त व शांतता राखावी, तसेच कोणत्याही पैलवानाला डोक्याला मारण्यास मनाई करण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, कुस्तीप्रेमी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख माझी संपच लुखमान शेट डॉ. पांडे व आयोजक व गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
