*योगानंद महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
वसमत..
श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संदीप गोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले लेखन प्रेरणा दिन हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आयोजित करण्यात आला ,याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ बाळासाहेब भिंगोले, प्रा डॉ.वर्षा दोडिया ,प्रा. डॉ. गौतम कांबळे ,प्रा डॉ.मिरा नाकाडे यांनी पुढाकार घेतला याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.
छाया नागेश चव्हाण
प्रतिनिधी सचिन घारपुरे
