भारतीय जनता पार्टी
छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश बनकर यांचा गुलाबराव पाटील कोलते यांनी सत्कार केला
सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश पांडुरंग बनकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सत्कार केला.
सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सिल्लोड येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला
यावेळी माजी सभापती अशोक गरूड, दिलीप दाणेकर, किशोर जगताप, मंडळ अध्यक्ष एकनाथ हिवाळे आदी उपस्थित होते.
फोटो मध्ये
- छत्रपती संभाजीनगर भाजपचे पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश पांडुरंग बनकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सत्कार केला.
