नरखेड पोलिसांची मोठी कारवाई:

*नरखेड पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ आरोपींना अटक, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त*

 

 

नरखेड:स्थानिक खाटीकपुरा परिसरात अवैधपणे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर नरखेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन दुचाकी, सहा मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २ लाख ७० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी नरखेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, खाटीकपुरा परिसरात काही इसम जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून छापा टाकला असता, तिथे नऊ जण जुगार खेळताना रंगेहाथ आढळले. पोलिसांनी या सर्वांना जागीच ताब्यात घेतले. यामध्ये धनराज लक्ष्मण घाटोले (वय ४३ वर्षे, रा. वॉर्ड क्र. १२, नरखेड), दिलीप प्रतापराव ठाकरे (वय ५८ वर्षे, रा. गुरुनुले ले-आऊट, नरखेड), असलम महमूद शाह (वय ३० वर्षे, रा. ईस्लामपुरा, नरखेड), शंकर तुलसीदास अरखेल (वय ५७ वर्षे, रा. सुदर्शन नगर, नरखेड), जबी जफरउल्ला खाँ पठान (वय ३६ वर्षे, रा. ईस्लामपुरा, नरखेड), कमलाकर नथुजी घोरमाडे (वय ५८ वर्षे, रा. झाडीपुरा, नरखेड), किसना गणपत बनसोड (वय ५३ वर्षे, रा. कुंभारपुरा, नरखेड), आसिफखाँ जकीउल्लाखाँ पठान (वय २८ वर्षे, रा. इस्लामपुरा, नरखेड) आणि विनोद संतोषराव तागडे (वय ४७ वर्षे, रा. खाटीकपुरा, नरखेड) यांचा समावेश आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते, २१ हजार ४५० रुपये किमतीचे ताशपत्ते किटबॉक्स, ६२ हजार रुपये किमतीचे सहा अँड्रॉइड मोबाईल, १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि १६ हजार ९० रुपये रोख असा एकूण २ लाख ७० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर सर्व आरोपींविरुद्ध नरखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *