कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा! जंगी कुस्त्यांचा फड आणि नाट्यमंडळांची भव्य मेजवानी

🚩 श्री दत्तात्रय प्रसन्न 🚩

 

विशेष प्रतिनिधी ओमकार पोतलवाड

 

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा!

 

जंगी कुस्त्यांचा फड आणि नाट्यमंडळांची भव्य मेजवानी!

स्थळ : मौजे कोलंबी, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड

 

सर्व भाविक भक्त, कुस्तीप्रेमी, व्यापारी बांधव आणि परिसरातील नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे कोलंबी येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

श्री १०८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महंत महाराज आणि दत्त संस्थान कोलंबी यांच्या कृपाशीर्वादाने या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम, महापूजा, पालखी सोहळा, दहीहंडी, जंगी कुस्त्यांचा फड तसेच नाट्यमंडळांच्या मनोरंजनाची विशेष मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

 

📅 यात्रेचे कार्यक्रम

 

२४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार

छोटी महापूजा पौर्णिमा.

 

२५ नोव्हेंबर २०२६, बुधवार

मोठी महापूजा.

 

२६ नोव्हेंबर २०२६, गुरुवार

भव्य पालखी सोहळा.

 

२७ नोव्हेंबर २०२६, शुक्रवार

दहीहंडी, जंगी कुस्त्यांचा फड आणि नाट्यमंडळांची भव्य मेजवानी.

 

🤼 जंगी कुस्ती स्पर्धा – आकर्षक बक्षिसे!

 

🥇 प्रथम बक्षीस – २१,००० रुपये

 

🥈 द्वितीय बक्षीस – १५,००० रुपये

 

🥉 तृतीय बक्षीस – ११,१११ रुपये

 

कुस्तीप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी असून परिसरातील नामांकित मल्लांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

 

कुस्ती स्पर्धा शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.

 

🎡 व्यापारी आणि व्यावसायिक बांधवांना विशेष आवाहन!

 

या यात्रेस व्यापारानिमित्त येणाऱ्या नाट्यमंडळे, खेळणी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, बांगडी विक्रेते, स्त्री शृंगार साहित्य विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, आकाशपाळणा, झुले, घोडे, चक्र, भांडी विक्रेते तसेच इतर व्यावसायिक बांधवांनी विशेष उपस्थिती लावून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

 

🙏 यात्रा कमिटी

 

अध्यक्ष : बाळुभाऊ बालाजीराव चिंतेवाड

 

उपाध्यक्ष : साहेबराव शंकरराव मुथळे

 

सचिव : अनिल मधुकर बैस

 

कोषाध्यक्ष : साईनाथ गणपती पोतलवाड

 

सदस्य :

 

रामचंद्र पा. शिंदे, लक्ष्मण पा. जाधव, बालाजी संपतवार, उत्तम शंकरराव गवाले, हरीदास गोविंदराव पा. शिंदे, डॉ. रमेश किशनराव गवाले, संजय मुधळे, रोहण बालाजी बैस, मधुकर पा. शिंदे, बालाजी नारायण सोनमनकर, व्यंकटेश देविदास पांचाळ, आरविंद सुदाम लांडगे, नयुम खाजामियाँ शेख, पंढरी पा. शिंदे, गोपाळ मारोती पोतलवाड आणि भिमराव रामजी लांडगे.

 

🎤 सूत्रसंचालन

 

प्रल्हाद पानगटवाड सर आणि संजय मुथळे सर.

 

🌺 विशेष आवाहन

 

या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला परिसरातील सर्व भाविक भक्त, नागरिक, कुस्तीप्रेमी आणि व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी.

 

आयोजक : समस्त गावकरी मंडळी, कोलंबी, ता. नायगाव, जि. नांदेड.

 

🚩 आपली उपस्थिती हीच यात्रेची शोभा! 🚩

 

सर्वांचे सहर्ष स्वागत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *