top of page

246 नगरपरिषदाआणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर उमरखेड शहरात तीन पक्षात चर्चा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 5
  • 3 min read

246 नगरपरिषदाआणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर उमरखेड शहरात तीन पक्षात चर्चा



प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेचा खरा नगरसेवक फिरोज खान लाला औदुंबर नगरी उमरखेड मध्ये आज एक नाव जनतेच्या तोंडी आहे तर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत माजी बांधकाम सभापती सौ वंदना सचिन घाडगे नगरअध्यक्ष पदाच्या शर्तीत! पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागण्याची तयारी! एक सक्षम उमेदवार ठरण्याची शक्यता

उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आजच निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला आहे 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिलांसाठी राखीव असून भारतीय जनता पार्टी व काँग्रेसमध्ये तथा एमआयएम व तिसरी आघाडी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यासाठी आपआपले उमेदवार उभे करू शकतात त्यात भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे तर काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दुर्मिळ असून सक्षम उमेदवार नसल्यामुळे काही महिन्याखाली स्थापन झालेल्या विदर्भ विकास आघाडी सोबत युती करण्याची वेळ राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसवर येत असून सदर आघाडीस नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची तयारी देखील काँग्रेसची असल्याचे बोलले जात आहे तर एम आय एम देखील आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करण्याची तयारी करीत असल्याचे समजते डॉक्टर गाझी असर यांच्या सौभाग्यवती किंवा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इरफान भाई यांच्या मातोश्री उमेदवार राहू शकतात एम आय मध्ये ही उमेदवारीची जास्त गर्दी नाही त्याचप्रमाणे नव्याने स्थापन झालेले"जलील कुरेशी मित्र मंडळ"नगराध्यक्ष पदाचीनिवडणूक लढणार असून माजी मुख्याध्यापक तथा एमआयएम चे माजी तालुकाध्यक्ष व समाजसेवक एजाज खान जनाब यांच्या सौभाग्यवती माजी उपाध्यक्षा सौ हसीना जरीन एजाज खान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहू शकतात त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना शहराध्यक्ष अडवोकेट संजीव कुमार जाधव यांच्या सौभाग्यवती सौ शारदाताई संजीव कुमार जाधव यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते भाजपा शिवसेना युती झाल्यास समीकरण वेगळं राहण्याची शक्यता आहे

*भारतीय जनता पार्टीत भाजपाचे नेते नितीन भुतडा यांच्या सौभाग्यवती निधी भुतडा यांना उमेदवारी द्यावी अशी तालुका व शहरातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे समजते परंतु नितीन भूतडा यांनी अद्याप होकार दिला नाही "कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांना लढू द्या" असं त्यांचे मत असल्याचे समजते त्यामुळे माजी नगरउपाध्यक्ष अरविंद भोयर यांच्या सौभाग्यवती किंवा जीन प्रेसचे उपाध्यक्ष एडवोकेट जितेंद्र पवार यांच्या सौभाग्यवती यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे तसेच माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा सौ भावनाताई बालाजी उदावंत ह्या देखील नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार असल्याचे समजतेअशातच एक तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समाजसेवेत अग्रेसर असलेले अनेक सामाजिक चळवळीतून जनहितासाठी कार्य केलेले मराठा आरक्षण चळवळीत मोठे योगदान असलेले तथा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड इत्यादी संघटना मध्ये कार्य करून आजही सामाज सेवेचे व्रत घेऊन जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व तहसील सेतु संचालक सचिन घाडगे यांच्या सौभाग्यवती, खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक दत्तात्रय घाडगे यांच्या सुनबाई तसेच तहसील सेतु संचालक संदीप घाडगे यांच्या वहिनी साहेब माजी सभापती सौ वंदना सचिन घाडगे देखील नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी सचिन घाडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न चालू आहेत सौ वंदना घाडगे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विजयाची शक्यता असल्याची ग्वाही सचिन घाडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जय राजसिहांसनशी बोलताना दिली आहे

तहसीलचे सेतू संचालक म्हणून सचिन घाडगे व संदीप घाडगे यांचा तालुका व शहरातील हजारो लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे प्रत्येक माणसाचे काम हसत मुखाने दोघेही बंधू सहज करतात त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल एक वेगळीच सहानुभूती आहे त्याचा फायदा त्यांच्या उमेदवारीला मिळू शकतो तसेच मराठा समाजाची मराठा आरक्षण किंवा कोणतीही चळवळ असो की अन्य कोणत्याही सामाजिक चळवळी असो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत व इतर अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे ही त्यांची जमेची बाजू आहे त्याचप्रमाणे माझी सभापती म्हणून सौ वंदना सचिन घाडगे यांनी शहरांमध्ये व स्वतःच्या प्रभागात देखील अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे लोकांची अनेक कामे त्यांनी नगरपरिषदेचे नगरसेवक व माजी सभापती असताना केली आहेत ही कामे करताना त्यांचे पती सचिन घाडगे यांची देखील त्यांना मोलाची साथ मिळाली आहे या सर्व त्यांच्या उमेदवारीसाठीच्या प्रभावी बाजू असून त्यांचा विचार पक्षश्रेष्ठींनी केल्यास त्यांचा विजय सहज होऊ शकतो अशा प्रतिक्रिया मिळत आहेत शेवटी कुणाला उमेदवारी द्यायची हा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे पाहूया काय होते? तूर्तास एवढेच! बाकी सविस्तर चर्चा तर होणारच


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page