युनियन बँकेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा मौदा– येथील युनियन बँकेचा स्थापना दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह सेवा देत असलेली ही शा
- CT India News
- 2 days ago
- 1 min read
युनियन बँकेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
मौदा– येथील युनियन बँकेचा स्थापना दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह सेवा देत असलेली ही शाखा आज परिसरातील नागरिकांचा विश्वासार्ह आर्थिक आधार बनली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे व्यवस्थापक प्रतीक वैद्य यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत करून बँकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सेवा व सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा, कर्जसुविधा, बचत योजना आणि विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
युनियन बँक मौदा शाखा ही ग्राहकाभिमुख सेवेसाठी ओळखली जाते. ज्येष्ठ नागरिकांना येथे कर्मचाऱ्यांकडून सौजन्यपूर्ण वागणूक मिळते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत येथील कर्मचारी नेहमीच मार्गदर्शन करीत असून अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच अलिकडच्या काळात शाखेतील ग्राहकसंख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
स्थापना दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमास गौरव गुजरवार, मिताली देवगिरीकर,बबिता बारसाकडे, अमित निर्वाण,रुपाली खटवार,अश्विन झोड, अजय येळणे निशांत मोटघरे,मारोडी सरपंच दिनेश गावंडे,सुरेश वैरागडे,संतोष सेलोटे, शुभम जिभकाटे यांच्या सह स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार









Comments