*जागृती विद्यालय पाचोरा, २००२-०३ बॅचचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!* पाचोरा: तब्बल २२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या जागृती विद्यालय, पाचोरा येथील सन २००२-२००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा
- CT India News
- 1 day ago
- 2 min read
*जागृती विद्यालय पाचोरा, २००२-०३ बॅचचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!*
पाचोरा: तब्बल २२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या जागृती विद्यालय, पाचोरा येथील सन २००२-२००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला.नाथ मंदिर जारगाव येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि त्यांचे तत्कालीन ज्येष्ठ शिक्षक आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली यावेळी सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देत पुन्हा एकदा मार्गदर्शन केले.तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले.
✨ शिक्षकांची उपस्थिती ✨
या स्नेहसंमेलनात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोकुळ पाटील सर.माजी मुख्याध्यापक राजेंद्र वाणी सर,आजी मुख्याध्यापक राजू सावंत सर,ज्येष्ठ शिक्षक डी.पी.पाटील सर,टी.आर.पाटील सर,आर.पी. बाविस्कर,नितीन वाघ सर, दिगंबर पाटील सर,देविदास पाटील सर,संजय वाघ सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली.
*• बालपणीच्या दिवसांचे अनुभव.*
आज जीवनात उच्च पदांवर कार्यरत असलेले विद्यार्थी या सोहळ्यात केवळ ‘विद्यार्थी’ म्हणूनच सहभागी झाले होते. त्यांनी बावीस वर्षांचे अनुभव सगळ्यांसोबत शेअर केले आणि शाळेचे ते दिवस पुन्हा जगता यावेत यासाठी विविध तासिका व खेळांचे आयोजन करण्यात आले होते.सर्व माजी विद्यार्थ्यांनी बालमित्रांसारखे आपले बालपण पुन्हा अनुभवले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाधान पवार,प्रशांत चव्हाण,कन्हैया देवरे,संदीप पाटील,चंद्रकांत पाटील,प्रफुल ठाकरे,समाधान पाटील, मनोज पाटील,उपेंद्र मगर,विकास ब्राह्मणे आणि सुवर्णा पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थिती होते त्यात *पीएसआय श्री वाल्मिक एकनाथ महाजन हे मुंबई येथे पीएसआय झाल्या बद्दल* विद्यार्थ्यां तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच चेतन पाटील,मच्छिंद्र पाटील,वैभव पाटील,शशिकांत ठाकरे,गणेश देवरे, किशोर चौधरी,अपर्णा अहिरे,राकेश पाटील,संतोष सपकाळे,विजय सावळे,राकेश पाटील,विश्वनाथ अहिरे,गुंजन सोनार,श्रीराम पवार,अलका वराडे,कुणाल देवरे,संजय अहिरे,रूपाली वाणी, श्याम ठाकरे,मुकेश सुतार, प्रज्ञा शिंदे,रवी सोनवणे,आदिनाथ पाटील,प्रशांत सोनवणे,महेश पाटील,योगेश देवरे,राहुल सोनवणे,सुरेश बागुल आणि ललिता ब्राह्मणे या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पवार यांनी केले,तर पीएसआय श्री वाल्मीक महाजन,संतोष सपकाळे, चंद्रकांत पाटील आणि प्रफुल ठाकरे यांनी प्रतिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास 'मधुर खान्देश' वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन आणि त्यांचे सहकारी प्रवीण बोरसे यांचीही आवर्जून उपस्थिती होती पत्रकार राहुल महाजन यांनी मनसोक्त पणे मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व मित्र-मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले.











Comments