top of page

_*झिंजेरिया च्या शिरपेच्यात मानाच्या तुरा* "श्री घनश्याम सर्याम हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित" दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील टाटा नाट्य सभागृह नरिमन

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 7, 2024
  • 1 min read

_*झिंजेरिया च्या शिरपेच्यात मानाच्या तुरा*

"श्री घनश्याम सर्याम हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित"

दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील टाटा नाट्य सभागृह नरिमन पॉईंट येथे श्री घनश्याम सर्याम यांना महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, विधानसभा अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन मॅडम तसेच शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे यांच्या हस्ते आदिवासी भागात उत्कृष्ट काम केल्याबाबत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आले. यानिमित्ताने स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले.

हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिल्या बाबत श्री घनश्याम सर्याम यांनी शासनाचे तसेच शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले. व या कामी सहकार्य करणारे जिल्हा परिषद सदस्य मा. हरीशजी उईके व शिक्षण समिती सदस्य शांताताई कुमरे त्याचप्रमाणे पंचायत समिती रामटेक चे सभापती मा. श्री चंद्रकांतजी कोडवते व मा. श्री विजयजी भाकरे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रामटेक, केंद्रप्रमुख श्री रमेश पवार सर यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती झिंजेरिया व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झिंजेरिया येथील सहकारी शिक्षकांचे सुद्धा आभार त्यांनी मानले. मागील २२ वर्षापासून श्री सर्याम हे अविरतपणे आदिवासी भागांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात तसेच त्यांनी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच शासनाने यावर्षीच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात आला.


तालुका प्रतिनिधी राहुल पानतावणे

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page