*अजून किती मृत्यू झाल्यावर प्रशासन जागे होणार?* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आज दि. 23/9/24 रोज सोमवारला *रामटेक* तालुक्यातील मौजा झिंझरिया गावात मंगळवारी संध्याकाळी *मिता बुद्धू कुमेर* या
- CT India News
- Sep 24, 2024
- 1 min read
*अजून किती मृत्यू झाल्यावर प्रशासन जागे होणार?*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज दि. 23/9/24 रोज सोमवारला *रामटेक* तालुक्यातील मौजा झिंझरिया गावात मंगळवारी संध्याकाळी *मिता बुद्धू कुमेर* या वयस्कर महिलेचा *वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला* होता. या प्रकरणी गावातील लोकांमध्ये संताप असून *देवलापार अप्पर तहसील कार्यालयावर*
साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी *श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)* यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. दरम्यान वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या *स्व.मिता बुद्धू कुमरे* व जखमी झालेले *श्री.श्याम सिरसाम* यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी च्या माध्यमातून .श्री.राजेंद्रजी मुळक यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी श्रीमती शांतताई कुंमरे (सदस्य जि.प. नागपूर), श्री रंजीत कोकोडे (सरपंच ग्रा.पं. कारवाई), श्री. प्रवीण उईके (सरपंच ग्रा.पं. पिपरीया), श्री. स्वप्नील सर्याम (उपसरपंच ग्रा.पं. दाहोदा) इत्यादी आंदोलनकर्ता, गावकरी मंडळी व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.Ct india news प्रतनिधी राहुल हटवार









Comments