top of page

आज वाळकी बुद्रुक येथे भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Oct 11
  • 1 min read

आज वाळकी बुद्रुक येथे भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा.


माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार.


भागवत देवसरकर यांची माहिती



भारतीय जनता पार्टी हादगाव पूर्व मंडळाच्या वतीने आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाळकी बुद्रुक येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे,या मेळाव्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.


आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जोश निर्माण व्हावा व भारतीय जनता पार्टीचे पक्ष संघटन अधिक मजबूत व्हावे या हेतूने हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे, मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे असणार आहे, तसेच जिल्हास्तरावरील प्रमुख नेतेमंडळी, पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत, तर मेळाव्याला बूथप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून,माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हदगाव दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून कार्यकर्ते येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जोमाने सामोरे जातील व पक्ष संघटनेला बळ मजबुती मिळेल अशी माहिती भागवत देवसरकर यांनी दिली आहे,या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळातील सर्व बूथप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्व मोर्चा सेल आघाडी, प्रकोष्ट संयोजक सर्व तसेच आष्टी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते, वाळकी बुद्रुक येथील ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत, या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भागवत देवसरकर यांनी केले आहे.


*सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव*

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page