top of page

आत्ताची धक्कादायक बातमी ! नदीपात्रात बुडून दोन मुलांना जलसमाधी.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 7, 2024
  • 1 min read

आत्ताची धक्कादायक बातमी ! नदीपात्रात बुडून दोन मुलांना जलसमाधी.


रामटेक तालुक्यातील महादूला येथील घटना.


रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादूला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. 7 सप्टेंबर रोजी 11 सकाळी वाजताच्या सुमारास घडली.


प्राप्त माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गट ग्रामपंचायत महादूला येथील वृषभ राजेंद्र गाडगे वय 13 वर्ष व रोहन सुभाष साऊसाखडे वय 13 वर्षे. हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, महादूला येथे इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत होते.


शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह झाला . सकाळी 11 वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले. दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊ लागला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही खोल पाण्यात बुडाला.


गावातील गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.

घटनेची माहिती महादूला येथील सरपंच शरद डडूरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना माहिती दिली.


त्यांनी तात्काळ SDRF टीम घटनास्थळी पाठवली. SDRF टीमने दोन बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.मात्र वृत्त लिहिस्तोवर दोन्ही मुलांचा शोध लागला नाही.


मृतक ऋषभ आणि रोहन दोघेही आईवडिलांना एकुलते एक असल्याचे समजते. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण गावात शोककळा पसरली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


सिटी इंडिया न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page